बीड महान्यूज लाईव्ह
अलिकडच्या काही वर्षात राज्यात रातोरात फेमस टिकटॉक स्टार बनलेला संतोष मुंडे अनेकांना परिचित आहे. काल मात्र बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलेवाडीत वीजेचा धक्का बसल्याने संतोष याचा मृत्यू झाला आहे. संतोषसह बाबुराव मुंडे यांचाही यात मृत्यू झाला आहे.
१३ डिसेंबर रोजी संध्याकाळी फ्यूज बदलण्यासाठी संतोष व बाबुराव हे दोघे शेतात गेले होते. त्यावेळी अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्या दोघांना वीजेचा धक्का बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान या दोघांच्या मृत्यूप्रकरणी स्थानिकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संतोष मुंडे याचे अनेक व्हिडीओ लाखो दर्शकांनी पाहिलेले आहेत. त्याचे लाखो फॉलोवर्स होते.