दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील केकान वस्ती परिसरात अज्ञात चोरांनी २लाख २१ हजार रुपयांचा सोन्या चांदीचे दागिन्यां ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
पाटस व कुसेगावच्या शिवेवर व श्री भानोबा विद्यालयाच्या जवळ असलेल्या पाटस गावाच्या हद्दीत केकाण वस्ती येथील सुरेखा जगन्नाथ केकाण यांच्या राहत्या घरातील देवघराच्या उघड्या दरवाजातुन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून देवघरातील कपाटाच्या ड्रॉवरमधुन व चोरकप्प्यातुन कपाटातील रोख तीन हजार रुपये, अडीच तोळ्याचे मुलीचे गळ्यातील सोन्याचे गंठण, अर्धा तोळ्याची कानातील सोन्याची फुले असा एकूण २ लाख २१हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि ९ ) रात्रीच्या सुमारास घडली आहे. कुसेगाव येथील श्री भानोबा देवाची यात्रा असल्याने कुसेगाव परिसरात मोठी गर्दी होती. पाटस कुसेगाव रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ होती. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही चोरीची घटना घडली आहे.
याबाबत सुरेखा जगन्नाथ केकाण यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिल्याने अज्ञात चोरांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार संदीप कदम, सागर चव्हाण, संजय देवकाते, भानुदास बंडगर, पोलीस शिपाई समीर भालेराव,गणेश टकले,हनुमंत खटके, सोमनाथ सुपेकर आदरणीय घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पाटस परिसरातील व्यापाऱ्यांची दुकाने फोडुन चोरीच्या घटना घडल्या आहेत. छोट्या मोठ्या चोरीच्या प्रकारात अलीकडे मोठी वाढ झाली असून पोलिसांनी अशा चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी व नागरिक करीत आहेत.