दौंड : महान्युज लाईव्ह
राज्यात प्रसिद्ध असणा-या दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा उत्सवाला आज पासून सुरुवात होत आहे. देव- दानव युद्धाचा खेळ पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते.
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील श्री भानोबा देवाची यात्रा आज शुक्रवारी (दि.९ ) व शनिवारी ( दि.१०) या दोन दिवस पार पडणार आहे. भानोबा देव मंदीराच्या आवारात देव आणि दानव युद्ध होणार आहे. या यात्रेला पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात.
यंदा ही मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव कमिटीने जय्यत तयारी व नियोजन केले आहे. ठिकठिकाणी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच पाटस, सुपा, पडवी या तिन्ही बाजूंनी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोयाळी वरुन आलेल्या भाविक भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेऊन यवत व पाटस पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून वाहतूकीची कोंडी होणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भानोबा देव – दानव युद्धाचा खेळ पाहण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागतासाठी कुसेगावकर सज्ज झाले आहेत.