अहमदाबाद – महान्यूज लाईव्ह
गुजरातमधील २७ वर्षांच्या सत्तेत काही बदल होणार काय याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र आता भाजप पूर्ण बहुमताकडे वाटचाल करीत आहे. पहिल्याच टप्प्यातील कलांनुसार भाजप १८२ जागांमध्ये १३० जागी आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस ४३ जागी आघाडीवर असल्याचे चित्र होते, मात्र सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणारा आप मात्र सपाटून पडला आहे.
गुजरातमध्ये यावेळी काय घडणार याची चर्चा होती. मात्र सर्वांचे अंदाज सपाटून आपटले. निवडणूकपूर्न सर्वेक्षणानुसार भाजपने बहुमताकडे वाटचाल केली. राजकोटमध्ये सर्व जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र ज्या पाटीदार नेत्याकडे सर्वांचे लक्ष होते, त्या हार्दीक पटेलची मात्र अवस्था बिकट करून टाकली आहे.
हार्दीक पटेल पिछाडीवर आहेत असा सुरवातीचा कल आहे.
मोठ्या आंदोलनामुळे पाटीदार समाजाचा नेता बनलेल्या हार्दीकला विजयासाठी मात्र झगडावे लागत आहे.
हिमाचलमध्ये मात्र कॉंग्रेस व भाजपची काटे की टक्कर.
हिमाचल प्रदेशातील ६८ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजप २४ जागी तर कॉंग्रेस २६ जागी आघाडीवर आहे, दोनच पक्षात ही चुरस सुरू आहे. ही काटे की टक्कर असल्याने नेमके कोणाला बहुमत मिळणार याची उत्सुकता आहे.