इंदापूर – महान्यूज लाईव्ह
ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावित्री महिला विकास संघ व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इंदापूरात पाच दिवसीय शरद कृषी महोत्सव या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आळे आहे.
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी ही माहिती दिली. इंदापूरातील १०० फूटी रोड अर्थात नवीन तहसील कार्यालयाशेजारी हा महोत्सव भरवण्यात येणार आहे. तो पाच दिवस चालणार आहे. याचे उदघाटन गुरूवारी (ता. ८) संध्याकाळी पाच वाजता माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे करणार असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या कार्यक्रमास सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, माजी जिल्हा परीषद सदस्य प्रताप पाटील, मंगलसिध्दी दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र तांबिले, माजी सभापती प्रशांत पाटील, माजी जिल्हा परीषद सभापती व सोनाई इटेबल्सचे प्रमुख प्रविण माने, माजी सभापती वैशाली पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याखेरीज जिल्हा परीषदेचे हनुमंत बंडगर, अभिजीत तांबिले, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, श्रीमंत ढोले बापूराव शेंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ डोंगरे, दीपक जाधव आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.
काय असणार आहे मेळाव्यात?
शुक्रवारी (ता.९) सकाळी ११ वाजता रुपाली चाकणकर, सौ. सुनंदा पवार, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम, शनिवारी (ता. १०) युवा महोत्सव होणार असून या महोत्सवात खासदार अमोल कोल्हे,आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, शर्मिला पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
रविवारी (ता.११) शेतकरी मेळावा होणार असून देशातील सर्वोत्तम सोनाई दूध प्रकल्पाचे प्रमुख दशरथ माने, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, नेचर डिलाईटचे अध्यक्ष अर्जून देसाई आदी मार्गदर्शन करणार आहेत.