दिल्ली महान्यूज लाईव्ह
दिल्ली महानगरपालिकेवर आपने झेंडा रोवला असून आप ने २५० पैकी १३४ जागा जिंकल्या, भाजपने त्याखालोखाल १०३ जागा जिंकल्या असून कॉंग्रेसने १० जागा जिंकल्या आहेत. आप दिल्ली महापालिकेवर सत्तेत आले आहे.
दिल्ली महापालिकेत यावेळी आपची सत्ता येणार असा अंदाज होता. तो अंदाज निवडणूक सर्वेक्षणांनीही व्यक्त केला होता. त्याप्रमाणेच निकाल जाहीर झाले आहेत. मात्र भाजपने अंदाजापेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत मोठी चुरस झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घराघरात पोचून आपला मतदान देण्याचे आवाहन करताना दिसले. मात्र निकालात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या चारही प्रभागात आपचा पराभव झाला.