दौंड- महान्यूज लाईव्ह
नवरा बायकोचे भांडण सुरू असताना हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मावस मामाला भाच्याने बेदम चोप दिला. भाच्यानेच आपल्याला मारहाण केल्याने वैतागलेल्या मामाने अखेर पोलिस ठाणे गाठले.
ही घटना दौंड शहरातील घंटाचाळ परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील घंटाचाळ येथील उत्तम लाला ओहोळ ( वय 36) याच्या घरा पासून काही अंतरावर राहणारी त्याची मावस बहीण सुरेखा मिटू ओहोळ व तिचा मुलगा गणेश मिटु ओहोळ व पत्नी पुजा या नवरा बायकोची भांडणे सुरू होती.
हे भांडण सोडवण्यासाठी उत्तम ओहोळ हा गेला. बायको आणि आईला का मारतो असे विचारले असता, गणेश याने स्टीलचे कडे उत्तम यांच्या डोक्यात जोरात मारून मारहाण केली. तसेच गणेश याने आई व पत्नी पुजा यांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
रविवारी ( दि.४) साडे दहा वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. याप्रकरणी उत्तम ओहोळ याने दौंड पोलीस ठाण्यात दिल्याने फिर्याद दिल्याने गणेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.