द
दौंड तालुक्यातील पाटस येथे पाटस ते कुसेगाव जाणाऱ्या रोडवर कारखान्याजवळ ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघाजणांचा मृत्यू झाला. ही माहिती पाटस पोलिस चौकी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
या अपघातात आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. संतोष सदाशिव साबळे, (वय अंदाजे 36), रोहिणी संतोष साबळे ,गुरू संतोष साबळे ( वय 5) रा. पाटस ता.दौड जि.पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसेगाव वरून पाटस कडे दुचाकीवर जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून येणार्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात आई व वडील हे जागेवर मयत झाले. पाच वर्षीय गुरू हा गंभीर जखमी होता, त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
शुक्रवारी (दिनांक २) दुपारी सव्वाबारा वाजता हा अपघात झाला. या घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत