दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वरवंड ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामदास जनार्दन दिवेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
दौंड तालुक्यातील सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी जन आंदोलन करत सामाजिक ते राजकीय नेतृत्व करणारे वरवंड येथील रामदास जनार्दन दिवेकर (वय ७५) यांचे गुरुवारी (दिनांक १) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
रामदास दिवेकर यांनी वरवंड ग्रामपंचायत चे सरपंच, भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद भूषविले होते.तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजार भावासाठी वरवंड येथे मोठे जनआंदोलन उभारले होते त्यावेळी त्यांच्यावर लाठी हल्ला ही झाला होता.
अशा लढाऊ नेत्याच्या निधनामुळे वरवंडसह तालुक्यात शोककळा पसरली आहे. दौंड तालुक्यातील धाडसी आणि आक्रमक राजकीय नेतृत्व हरपले असल्याची भावना राजकीय व सामाजिक क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.