दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडवी येथील एक विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. याबाबत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. ही माहिती पोलीसांनी दिली.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडवी येथील आधिका महेश शितोळे (वय 27 रा.जगताप वस्ती, पडवी ता.दौंड जि.पुणे ) ही महिला रविवारी (दिनांक 27) रोजी पासून बेपत्ता झाली आहे. या महिलेबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास त्यांनी पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे (मो. 90111 27770) व पोलीस हवालदार संजय देवकाते (मो. 99236 95728) या नंबरवरती संपर्क करावा.