बारामती : महान्यूज लाईव्ह
भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक बारामती तालुक्यातील खांडस गावातील शेतात उतरवले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
बारामती तालुक्यातील खांडज गावात आज सकाळी साडेदहा वाजता अचानक एक हेलिकॉप्टर उतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच बारामतीतील शिकाऊ विमान कंपनीचे विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी नजीक कोसळले होते. त्यामुळे या ठिकाणी नक्की काय झाले याची माहिती थोड्या वेळ लोकांना मिळाली नसल्याने सगळीकडे वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार हे वायुदलाचे हेलिकॉप्टर असून खांडस गावातील शेतात हेलिकॉप्टर उतरल्यानंतर माळेगाव पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त पुरवला असून वायुदलाचे अधिकारीही या ठिकाणी पोचले आहेत. इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर या ठिकाणी कोणालाही कसलीही इजा झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.