बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या साहित्यकट्टा मध्ये यावेळी कादंबरीकार विश्वास पाटील येत आहेत. त्यांचे साहित्यविश्व उलगडण्याची व त्यांच्याकडून त्यांचा जीवनप्रवास ऐकण्याची बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील श्रोत्यांसाठी एक चांगली पर्वणी असणार आहे.
१ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता बारामतीतील तांबेनगर येथील भिकोबा तांबे मेडीकोज गिल्ड सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रम वेळेतच सुरू होणार असल्याची माहिती भाषण कला प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 9960066966 या क्रमांकावर संपर्क साधावा.
संभाजी, पानिपत, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी, महासम्राट अशा विविध कादंबऱ्यांमुळे सुपरिचित असणाऱ्या विश्वास पाटील यांना ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामतीकरांना मिळणार आहे.