दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड येथील ढमेवस्तीत सन २०१६ मध्ये झालेल्या खून व दरोड्यातील सराईत गुन्हेगार विठ्ठल उर्फ ठवा अशोक भोसले (वय ३५ रा. गणेगाव दुमाला ता.शिरूर जि.पुणे) याला यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सोलापूर जिल्ह्यातील अरण येथून ताब्यात घेतले आहे.
ही माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. १४ मार्च २०१६ रोजी दौंड येथील ढमे वस्ती, माने हॉस्पिटल येथे अज्ञात ७ ते ८ इसमांनी बारवकर यांचे राहत्या घरी कुटुंबीय झोपले असताना अचानकपणे घराचा दरवाजा तोडून घरात घुसून लोखंडी रॉड व तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर व हातावर मारहाण करून अनिल भिमराव बारवकर यांना डोक्यावर, मानेवर गंभीर दुखापत करून त्यांचा खुन करून घरातील मौल्यवान चीज वस्तू व सोन्याचे दागिने असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती.
या घटनेचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात आता पर्यत ६ आरोपी अटक करण्यात आले होते. या गुन्ह्यातील निष्पन्न असलेला आरोपी विठ्ठल उर्फ ठवा अशोक भोसले हा फरार झाला होता. हा आरोपी कुर्डुवाडी, भूम, परांडा, अरण भागामध्ये राहत असलेची माहिती यवत गुन्हे शोध पथकाला मिळाली होती.
त्यानुसार या गुन्हे शोध पथकाने अरण ( ता.माढा जि. सोलापूर ) येथून ठवा भोसले याला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्यास दौंड पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आलेले आहे. ठवा भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यवत, बारामती तालुका पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचा गुन्हे दाखल आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, अजित काळे,
गणेश कुतवळ, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.