पुणे महान्यूज लाईव्ह
नवले ब्रिजवर एका कंटेनरने आज तब्बल ४८ वाहनांना धडक दिली आणि १० जणांना जखमी केले. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे असे घडले असावे असा प्राथमिक अंदाज होता, मात्र खरी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पोलिसही चक्रावले आहेत.
नवले ब्रिजवरून जाताना जर वाहन न्यूट्रल केले, तर एकाच टप्प्यात एक ते दीड लिटर डिझेल वाचते. तीन टप्प्यात तीन लिटरपर्यंत डिझेल वाचत असल्याने चालकाला तेवढेच २०० ते ३०० रुपये दिवसाला मिळतात.
केवळ या एकाच कारणामुळे काल रात्री हा मोठा अपघात झाला. भरधाव कंटेनरने तब्बल ४८ वाहनांना धडक देऊन या वाहनांचे नुकसान केल्याने पुण्यात आणि राज्यभरात याची चर्चा झाली. मात्र जेव्हा चालकांकडून होणारा हा प्रकार समजला, तेव्हा नेटकऱ्यांनी अगोदर चालकाला ताब्यात घ्या, त्याला आणि मालकाला हा दंड करा, त्याशिवाय असे जाग्यावर येणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
काही जणांनी तर ट्रक चालकांनो, आपापल्या ड्रायव्हरला पगार वाढवून द्या! ते फक्त तुमची ट्रक धोक्यात घालत नाहीत, तर रस्त्यावरच्या निष्पा हजारो जणांचा जीव धोक्यात घालतात. अशा नराधमांना एक तर कामावर ठेवू नका, नाहीतर त्यांना पगार तरी वाढवून द्या अशी देखील मागणी नेटकरी करताना दिसत आहेत.