• Contact us
  • About us
Wednesday, February 1, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१४ महिने.. ५५ वाळूमाफियांना लगाम! पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी लावली होती दौंडकरांना शिस्त!

Maha News Live by Maha News Live
November 21, 2022
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा पोलीस ठाण्याचा कालावधी पूर्ण होण्या अगोदरच राजकीय दबावामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र त्यांचा दौंड पोलीस ठाण्यात अवघ्या १४ महिन्यांच्या कालावधीत विनोद घुगे यांनी वाळू माफिया व अवैध धंदेवाले यांच्यावर धडकी बसवणारी अशी कारवाई केली.

दौंड शहरासह तालुक्यात राजकीय वरदहस्ताने सुरू असलेल्या भीमा नदी पात्रातील व उजनी धरण क्षेत्रातील बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी नदीपात्रात उतरून त्या उध्वस्त करीत तब्बल ५५ वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडस पोलीस निरीक्षक घुगे यांनी केले होते.

राजकीय दबावाला न जुमानता शहरासह ग्रामीण भागातील मटका, हातभट्टी गावठी दारू, जुगार अशा अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई करीत अवैद्य व्यवसायांना चाप बसवला. परिणामी त्यांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायिक पोलीस ठाण्याच्या आवारात फिरकतही नव्हते, त्याचबरोबर शहरातील नागरिकांना अडथळा ठरणाऱ्या बेशिस्त वाहनांवर कारवाई करत त्यांना शिस्त लावण्याचे काम पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी त्यांच्या कालावधीत केले.

रिक्षा चालकांना वाहतुकीचे नियम समजावून त्यांना ड्रेस कोड देण्यात आले, विद्यालय व महाविद्यालयांच्या आवारात शालेय विद्यार्थिनींची तसेच अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्यांना रोडरोमीओ यांना पोलीस स्टाईलचा प्रसाद देत चांगला धडा शिकवला. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्व सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीसाची दहशत निर्माण करण्याचे काम घुगे यांच्या कामामुळे झाली.

एकंदरीत चोर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती, स्वार्थी राजकारणी, अवैध व्यवसाय करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम एक पोलीस निरीक्षक म्हणून घुगे यांनी केले, शहरातील इतिहासात पहिल्यांदाच दौंड शहरातील रस्त्यावर स्वतः उतरून पायी पेट्रोलिंग करून रस्त्यावर टवाळकी करणाऱ्या टवाळखोर, वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला.

दौंड नगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे कामही केले , दौंड शहरासह ग्रामीण भागाच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना जेरबंद केले. मोकाअंतर्गत व दोन वर्षापासून येरवडा तुरुंगातुन फरार झालेल्या अक्षय चव्हाण या आरोपीला पकडून पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी केली.

सर्वात लक्षवेधी कारवाई केली ती शहरातील व्यापारी भकतू शेठ सूखेजा यांच्या दरोड्यातील आरोपींना बारा तासांच्या आत पकडून त्यांच्याकडील ९ लाख ८३ हजार रुपये जप्त करुन ते व्यापारी सुखेजा यांना परत मिळवून दिले. महावितरण कंपनीचे रोहीत्रे व विद्युत साहित्यांची चोरी करणारी अट्टल टोळी पकडली.

१४ लाखांचे मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्याचे काम पोलीस निरीक्षक घुगे यांनी केले. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व आपल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करू नका असे सांगत पोलीस ठाण्यात चकरा मारणाऱ्या व राजकीय हस्तक्षेप करून पोलीस कारवाईत अडथळा ठरणाऱ्या या राजकीय नेत्यांना फारसं महत्व न देता कायद्याच्या चौकटीत राहून लोकहिताचे काम त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच गणेशोत्सव या कार्यक्रमांत सर्व जातीधर्माच्या नागरिकांना बरोबर घेऊन कार्यक्रमापूर्वी बैठक घेऊन चर्चा करीत योग्य पद्धतीने नियोजन करून हे कार्यक्रम शांततेत पार पाडत जातीय व धार्मिक तेढ न होऊ देता सामाजिक सलोखा जोपासण्याचे मोठे काम घुगे यांनी त्यांच्या कालावधीत केले.

या कालावधीत त्यांनी राजकीय हस्तक्षेप व राजकीय नेत्यांना फारसं महत्त्व न देता पोलीस ठाण्यात मदतीसाठी आलेल्या नागरिकांचे काम कायद्याच्या चौकटीत राहून केले. मात्र त्यांचे हे काम काही राजकीय मंडळींचे राजकरण करू देत नव्हते. त्यामुळे काही राजकीय मंडळींनी आपल्या ऐकण्यातील व मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी मागील तीन-चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते.

तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रारी करीत बदलीसाठी तगादा लावला होता. मात्र घुगे यांच्या त्यांच्या चांगल्या कामकाजामुळे तत्कलीन पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दौंड राष्ट्रवादीचा नेता व माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह वीस जणांवर विनयभंग व ॲट्रॉसिटी सारखे गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात आले.

त्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक वेळेत झाली नाही. आणि या निमित्ताने काही राजकीय मंडळींनी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना लक्ष्य केले. पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. पडद्याडून कोणता राजकीय नेता डाव रचत होता हे दौंड शहरासह तालुक्यातील नागरिकांना चांगलेच माहीत होते. तशी चर्चाही घुगे यांच्या बदलीनंतर शहरात सुरू आहे.

अर्थात ज्या प्रकरणाच्या नावाखाली पोलीस निरीक्षक घुगे यांची बदली करण्यात आली मुळात तो तपास त्यांच्याकडे नव्हता. हा तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडे होता, या गुन्ह्याचा तपास व या गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याची जबाबदारी धस यांच्याकडे होती. मात्र तपासी अधिकारी राहुल धस यांची बदली करण्याऐवजी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचीच तडकाफडकी बदली कशी काय करण्यात आली? असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत.

आता बदली झालीच आहे. पण पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी अवघ्या १४ महिन्याच्या कालावधीत केलेल्या कामकाज हे लक्ष्यवेधी ठरले. हा कालावधी वाळू माफिया व अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा कर्दनकाळ ठरला, तर राजकीय हस्तक्षेप होऊ देत नसल्याने त्या स्वार्थी राजकारणाची डोकेदुखी मात्र नक्कीच ठरली.

Next Post

दौंडकर म्हणाले, बारामतीत न्याय मिळाला..! ९ वर्षाच्या बालिकेचा तळतळाट..! फक्त एकाच वर्षात निकाल..आणि तब्बल २० वर्षांचा कारावास..! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दौंडच्या नराधमास बारामती सत्र न्यायालयाची तब्बल वीस वर्षाची कारावासाची शिक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नियती प्रत्येकाचं माप पदरात टाकते.. खून केला..मग मृतदेह दरीत टाकायला गेले, पण स्वतःच दरीत पाय घसरून पडले.. अन् ढगात गेले..!

January 31, 2023

उसका जी करता था की, उसे तिहार जेल में चक्कर काटना था!बलात्कारी स्वयंघोषित संत आसारामला गंधीनगर कोर्टाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा.!

January 31, 2023

बलात्कारी आसाराम बापूसाठी आजचा दिवस महत्वाचा… आज गांधीनगर कोर्ट काय निकाल देणार?

January 31, 2023

साताऱ्यातला संजय मदने.. ज्याने चोरले 62 तोळे सोने..! सगळंच बाहेर काढलं, साताऱ्याच्या एलसीबीने..!

January 30, 2023

वाईत एका रिक्षासह १ लाख २० हजारांची बेकायदेशीर दारु जप्त! 

January 30, 2023

त्या मायलेकींच्या मनातही आलं नसेल गोकर्ण पाहून येताना तो आपला शेवटचा दिवस असेल..!  सातारा पुणे महामार्गही काही क्षण थांबला.. अनेकांच्या पापण्या ओलावल्या.. 

January 30, 2023

दारू पिताना वाद झाला.. कुरकुंभच्या तिघांनी बारामतीच्या एकाला कायमचा संपवला!

January 30, 2023

बारामतीच्या वाळू माफियांना चक्क एलसीबीनं रोखले.. वाळू माफियांनी टोकले..मग त्यांनी सहा जणांवर गुन्हा आणि जप्त केली सगळी वाहने..!

January 30, 2023

वरवंड येथून शालेय विद्यार्थी बेपत्ता.!

January 30, 2023
जेव्हा गांधी जातात तेव्हा…… ३० जानेवारीला नेमके काय घडले

जेव्हा गांधी जातात तेव्हा…… ३० जानेवारीला नेमके काय घडले

January 30, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group