कोलकता – महान्यूज लाईव्ह
त्याचं नाव श्रीकांती कुमार दत्ता.. पण त्यानं केलेल्या अफलातून आंदोलनामुळे पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्हा देशात चर्चेत आला.. शिधापत्रिकेवर दत्ता चे नाव कुत्ता लिहीले गेले आणि अनेक चकरा मारूनही त्याचे नाव काही बदलेना.. मग त्यांनी अभिनव आंदोलन केले.. कुत्र्यासारखं भुंकून त्यांनी सरकारी यंत्रेला परेशान केले.. मग बीडीओंनी अखेर आदेश दिला आणि त्याचं नाव पुन्हा दत्ता झालं..
याचा व्हिडीओ येथे पहा, अथवा महान्यूज लाईव्हच्या फेसबुक पेजवर पाहू शकता..
बांकुरा जिल्ह्यातील या अभिनव आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे जसे लक्ष गेले, तसेच येथील सरकारी यंत्रणेचेही हसू झाले. श्रीकांती यांच्या शिधापत्रिकेचे अधुनिकीकरण नुकतेच झाले. नवी शिधापत्रिका हातात आल्यावर त्यांना धक्काच बसला.
त्यांचे नाव श्रीकांतीकुमार दत्ता ऐवजी श्रीकांतीकुमार कुत्ता असे झाले होते. मग त्यांनी लागलीच सरकारी यंत्रणेकडे दाद मागितली. मात्र चकरांवर चकरा मारण्याखेरीज त्यांच्या हातात काहीच राहीले नाही.
अनेकदा चकरा मारल्यानंतरही अधिकारी एकाकडून दुसऱ्याकडे असे टोलवत असल्याने अखेर शासकीय कार्यालयाच्या आवारात श्रीकांती यांनी अभिनव आंदोलन सुरू केले. प्रत्येकाला ते आपली कागदपत्रे दाखवत कुत्र्यासारखे भुंकू लागले.
शासकीय इमारतीत असलेल्या अधिकाऱ्यांकडे जाऊन भुंकू लागले. एखादा अधिकारी कार्यालयाबाहेर चालला की, त्याच्या गाडीचा पाठलाग करीत भुंकू लागले. गटविकास अधिकाऱ्यावर ते भुंकल्यानंतर तेही घाबरून गेले. मात्र त्यांना प्रकार लक्षात येताच त्यांनी श्रीकांती यांची समस्या नीट जाणून घेतली आणि त्यांनी हे नाव बदलण्याचा आदेश दिला. त्यानंतर मात्र श्रीकांती यांच्या शिधापत्रिकेतील कुत्ता गायब होऊन दत्ता हे नाव आले..