शिरूर – महान्यूज लाईव्ह
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील दोन पेट्रोल पंपावर शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
न्हावरे (ता.शिरूर) येथील एच. पी.पेट्रोल पंप तसेच शिरूर येथील पाषाणमळा येथील पेट्रोल पंप नुकताच मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शास्त्राचा धाक दाखवून लुटून नेला होता. या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांनी कसून चौकशी करत तांत्रिक व सीसीटिव्ही फुटेज च्या आधारावर गोपनीय माहितीच्या आधारे करण युवराज पठारे (वय. २०, रा. गुजरमळा मूळ रा. रायगव्हाण, ता. श्रीगोंदा), रोहन सोमनाथ कांबळे (वय २०, रा. बोऱ्हाडेमळा), अजय जगन्नाथ माळी (वय.२३, रा. माठ, नेहरवाडी, ता.श्रीगोंदा), अजय सोमनाथ लकारे (रा. माठ, ता. श्रीगोंदा) या आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून दोन्ही गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यात वापरलेले चार कोयते पोलिसांनी जप्त केले आहे. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार राजू मोमीन, जनार्दन शेळके, गुरू जाधव, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, सहायक फौजदार मुकुंद कदम यांनी केला.