सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी रतिलाल कुचेकर व सतिश भोंग यांची नुकतीच निवड करण्यात आली.
या वेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब नरूटे, कास्ट्राईब चे अध्यक्ष सुहास मोरे ,पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय ठोंबरे ,व्हाईस चेअरमन सतिश गावडे ,शिक्षक भारतीचे अध्यक्ष सतीश शिंदे ,जेष्ठ संचालक बालाजी कलवले व सर्व संचालक यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला या वेळी संचालक शशिकांत शेंडे , सचिन देवडे , सुहास मोरे , बालाजी कलवले , अध्यक्ष नानासाहेब नरूटे ,पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय ठोंबरे , इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी संस्थेचे सर्व संचालक ,राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, शिक्षक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .