सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
तुकाराम मुंडे आरोग्य खात्याचे आयुक्त झाल्यापासून त्यांनी दवाखान्यांच्या भेटी वाढवल्या आहेत, त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा आज इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील आरोग्य केंद्रास सीईओ आयुष प्रसाद यांनी भेट दिली, तेव्हा त्यांनी स्वतः बीडीओ विजय परीट यांचाच बीपी तपासला.. तेव्हा जो संवाद घडला, तो ऐकून सारेच हसू लागले..
पळसदेवच्या आरोग्य केंद्रास आयुष प्रसाद यांनी भेट देऊन माहिती घेतली. या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तब्बल ८ बालमृ्त्यू झाले आहेत ही माहिती ऐकून सीईओंना धक्काच बसला. दरम्यान पळसदेवला भेट दिल्यानंतर त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी विजयकुमार परीट हे होते.
केंद्रात आल्यानंतर प्रसाद यांनी चला, इंदापूरला कामाचा ताण असतो, आपण बीडीओसाहेबांचा बीपी तपासू असे म्हणून त्यांनी थेट परीट यांची तपासणी केली. मग त्यांनी तुमचा बीपी नॉर्मल आहे, कुठे आहे ताण? असा सवाल केला.
त्यावर बीडीओ परीट यांनी अहो, साहेब, आता तुम्ही आलाय ना, म्हणून हा ताण कमी झाला असेल असे सांगितले आणि उपस्थित साऱ्यांनाच हसू आवरले नाही. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, अनिल देशमुख, राजेंद्र काळे आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.