बारामती – महान्यूज लाईव्ह
विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी बारामतीत येत असून पहाटे पावणेसहा वाजल्यापासून ते बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. सकाळी दहा वाजता ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
मागील आठवड्यात पवार बारामतीत आले होते. शनिवारी सकाळी पावणेसहा वाजता ते शहरातील विविध विकासकामांची पाहणी करतील. सकाळी नऊ वाजता ही पाहणी संपवून ते साडेनऊ वाजता बाचल टॉवर गांधी चौक येथे हॉटेल बारामती मिसळ या दुकानाचे उदघाटन करणार आहेत.
त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञान सभागृहात ते येणार असून येथे त्यांनी कार्यकर्त्यांना राखीव वेळ दिला असून ते त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना भेटतील.
त्यानंतर दुपारी दीड वाजता तालुक्यातील तरडोली येथे टिसीएस कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुरंदर उपसा सिंचन योजनेतील १ किलोमीटर लांबीच्या आरसीसी पाईपलाईनमधून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे भूमीपूजन करणार आहेत.