दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 20 ते 22 जणांना चावा घेतल्याने नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे.
दौंड मधील राज्य राखीव पोलिस दल असलेल्या लिंगाळी भागातील कॅम्प परिसरात म्हसोबा देवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक या ठिकाणी येतात. मात्र त्या यात्रेमध्ये इतर भटकी कुत्री दिसत असल्याने त्यांच्यामध्येच अचानक आज पिसाळलेले एक कुत्रे शिरले.
हे कुत्रे फक्त यात्रेत शिरले नाही, तर त्याने अनेकांना चावा घेतला. एकाचवेळी अनेकांना पिसाळलेले कुत्रे चावल्याने नागरिक भयभीत झाले व त्यांची पळापळ झाली. दरम्यान जिल्हा रुग्णालयात या जखमींवर उपचार करण्यात आले.
दौंड नगरपालिकेकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू असून पिसाळलेला कुत्र्याला पकडण्यासाठी दौंड नगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रसाद लाड यांनी जखमींवर केलेल्या उपचाराची माहिती दिली.