नाशिक – महान्यूज लाईव्ह
अनेकदा साप पकडल्यानंतर उत्साही सर्पमित्र सापाबरोबर खेळ करतात. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पत्नीच्या छळाला कंटाळून होर्डींग चिकटवणाऱ्या पतीने नाग पकडला. गच्चीवर नेला. त्याच्याबरोबर स्टंटबाजी करायला सुरवात केली आणि मग नागाने त्याच्या ओठाला, गालाला दंश केला. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
नागेश हा सिन्नर शहरात वेल्डींगची तसेच होर्डींग्जची कामे करीत होता. तो सर्पमित्रही होता असे सांगितले जात आहे. मात्र त्याचा पत्नीसोबत वाद झाल्याने तो तो पत्नीला सोडून कंटाळून घर सोडून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले, तर दुसरीकडे त्यानेही व्हिडीओ क्लिप तयार करून पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. पत्नीकडून त्याला व कुटुंबियांना त्रास होत असल्याचे त्याने मुद्रांकावर नमूद केले होते.
दुसरीकडे पत्नीनेही पती गायब झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र नागेशने व्हिडीओ क्लिपमध्ये आपण सिन्नर शहरातच असल्याचे सांगितले होते. अशातच दोन दिवसांपूर्वी आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले आणि खरोखरच नागाने त्याची सुटका केली.
सिन्नर परिसरात पकडलेला विषारी नाग त्याने सिन्नर महाविद्यालयासमोरील कॅफेच्या गच्चीवर नेला. तेथे त्या नागासोबत त्याने स्टंटबाजी केली. यात नाग त्याच्या गालाला व ओठांना चावला. त्यामुळे तात्काळ विष भिनले आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.