सोलापूर- महान्यूज लाईव्ह
भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजन पाटील- प्रशांत परिचारक गटाने या कारखान्यासाठी ताकद लावली होती. मात्र धनंजय महाडिकच या कारखान्याचे शिल्पकार ठरले. धनंजय महाडिक व त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक हे दोघेही या निवडणूकीत विजयी झाले.
धनंजय महाडिक यांच्या भिमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व १५ उमेदवार विजयी झाले. संस्था प्रतिनिधी गटातून धनंजय महाडिक यांनी ३१ मते मिळवून राजेंद्र चव्हाण यांचा १९ मतांनी पराभव केला. या गटाची मतमोजणी सर्वप्रथम झाली, त्यानंतर सर्व फेऱ्यांमध्ये सर्व गटांमध्ये धनंजय महाडीक यांचीच सरशी झाली.
पुळूज गट – विश्वराज महाडिक – १० हजार ६२९ मते, बिभिषण वाघ – १०२३७ मते, (भिमा शेतकरी विकास आघाडी). टाकळी-सिकंदर गट – संभाजी कोकाटे -१०५८८ मते, सुनील चन्हाण १०५६३ मते (दोन्हीही भिमा शेतकरी विकास आघाडी).
सुस्ते गट – तात्यासाहेब नागटिळक-१०७६४ मते, संतोष सावंत – १०१३८ मते. (भिमा शेतकरी विकास आघाडी). अंकोली गट – सतीश जगताप : १०१९० मते, गणपत पूदे : १००३१ मते (भिमा शेतकरी विकास आघाडी). कोन्हेरी गट : राजेंद्र टेकळे : १०५७१ मते, (भिमा शेतकरी विकास आघाडी)
अनुसूचित जाती जमाती गट – बाळासाहेब गवळी : १०७४६ मते(भिमा शेतकरी विकास आघाडी). महिला राखीव – सिंधू जाधव : १०७७८ मते, प्रतीक्षा शिंदे : १०२९२ मते (भिमा शेतकरी विकास आघाडी). इतर मागास प्रवर्ग गट – अनिल गवळी : १०८६४ मते(भिमा शेतकरी विकास आघाडी).
भटक्या विमुक्त जाती जमाती – सिद्राम मदने : १०७७८ मते (भिमा शेतकरी विकास आघाडी).