सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी दत्तात्रय ठोंबरे आणि उपसभापती सतीश गावडे यांची बिनविरोध करण्यात आली. मावळते सभापती अदिनाथ धायगुडे आणि उपसभापती रामचंद्र शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी जे.पी.गावडे यांनी निवड प्रक्रिया राबविली.
नवनियुक्त सभापती दत्तात्रय ठोंबरे यांनी २० वर्षे संचालक म्हणून काम पाहिले आहे. दोन वर्षे उपसभापती म्हणून काम पाहिले होते. निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना ठोबरे म्हणाले संस्थेचा कारभार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहील. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शी आणि काटकसरीचा कारभार केला जाईल. सर्व संचालक मंडळ आणि चारही शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन संस्था प्रगतीकडे घेऊन जाण्याचा संकल्प करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे, इब्टाचे तालुकाध्यक्ष सहदेव शिंदे, कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष व संचालक सुहास मोरे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष सतीश शिंदे, दत्तात्रय तोरसकर, सुरेश पांढरे, उद्धव गरगडे, चंद्रकांत गोरे, मारूती सुपूते, रतिलाल कुचेकर, रविंद्र सातव, सुरेश साळूंके, बाळासाहेब महानवर ,आत्माराम मारकड ,संजय दगडे ,महावीर देवडे, राजकुमार तरंगे, बबन सुरवसे, प्रताप भगत , रमेश शेलार ,पांडूळे, अंबादास नरूटे, महेश थंबद ,सुर्यकांत गुंड, संतोष घोडके, सिद्धेश्वर गणगले, जमीर शेख, दिनेश काळे , शामसुंदर माने, गणेशसिंह मोरे, महेश साळूंके, विद्यासागर गायकवाड, अरुण कांबळे, उज्वल कुमार सुतार व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.