विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती – आज अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी विनाकारण केसेस केले जातात. असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी त्याबद्दल मला आता काही तुम्हाला सांगायचं नाही. मी त्याच्या संदर्भामध्ये मंगळवारी बोलणार आहे.
त्यावेळेस सारे सांगेन. कारण लोक काही डोळे झाकून बसत नसतात. लोक सगळ काही चाललेलं आहे ते पाहत असतात. महाराष्ट्रातील लोक समजून घेत असतात की कसं चाललंय,काय चाललंय, कोण काय करताय, कुणाच्या चुका आहेत, कुणाच्या बरोबर आहेत. कोण चुकीचे स्टेटमेंट काढतेय. महाराष्ट्रामध्ये कधी वडीलधाऱ्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करायला शिकवलेलं नसताना देखील काही राजकीय पक्षाचे नेते हे जाणीवपूर्वक काही ना काही वक्तव्य त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय.
ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही. अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अजिबात घडता कामा नये कोणत्याच पक्षाच्या नेत्यांच्या कडून प्रवक्त्यांच्याकडून किंवा त्या पक्षांच्या प्रमुखाकडून अशी टीका अजित पवार यांनी बारामतीमध्ये केली.
मी चार आणि पाच तारखेला रात्री उशिरा इकडून बाहेरगावी गेलेलो होतो. परदेशात होतो. दहा तारखेला रात्री उशिरा परत आलो. ११ तारखेला मी दिवसभर आपल्या मावळमध्ये होतो. १२ तारखेला मी माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यात होतो. शिरूरची पण लोक मला भेटली आणि आज मी बारामतीमध्ये आहे.मी त्यावेळेस मला काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोललो. असे अजित पवार म्हणाले.
भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब जाणार होते. अशी सुरुवातीला बातमी आलेली होती. परंतु तब्येतीच्या कारणास्तव साहेब गेले नाहीत. परंतु आमचे प्रांताअध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे तिघे आणि इतर काही कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे देखील त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि काँग्रेसचे तर सगळे सहभागी आहेत.
प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना किंवा पक्षाच्या नेतेमंडळींना अशा प्रकारच्या यात्रा काढण्याचा अधिकार आहे. याच्या आधी आपले पूर्वीचे पंतप्रधान चंद्रशेखर साहेबांनी पण पदयात्रा काढलेली होती. त्याच्या आधी अडवाणी साहेबांनी पण रथयात्रा काढलेली होती. आता राहुल गांधीजींनी पदयात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत काढली आहे. ते त्यांच्या परीने त्यांना जे काही योग्य वाटतं, त्यांना आता काम करत असताना ज्या गोष्टी जाणवतात. त्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताहत आणि त्यांच्या पक्षाबद्दल एक वातावरण कसं निर्मिती करता येईल या पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे. तर हा प्रयत्न चालू करत असताना प्रत्येक पक्ष आपापल्या परीने राज्यांमध्ये देशांमध्ये अशा प्रकारचं काम करत असतो.असे अजित पवार म्हणाले.
संजय राऊत यांनी मध्यावर्तीची शक्यता वर्तवली असे विचारल्यानंतर त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितल. प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक आमदार, नेते नाराज आहेत त्यांना मंत्रिपद देतो म्हटले होते पण दिलेलं नाही. असा प्रश्न विचारल्यानंतर असं बातम्या ऐकायला मिळतात ,मला कुठल्याही त्यांच्यातल्या चाळीसआमदारांच्यापैकी कोणी तसं सांगितलेलं नाही. मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्या संदर्भात बोलणं उचित नाही. असं अजित पवार म्हणाले.