सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व समाजातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या पोलीस मित्र परिवार संघाच्या महिला राज्य संघटक रेश्मा नौशाद शेख यांना राजमाता बहुउद्देशीय समाजिक सेवाभावी संस्था अंतर्गत रक्तदान हेच जीवनदान ग्रुप च्या वतीने राजमाता जिजाऊ रत्न व समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान कार्यक्रम पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगर येथे पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार,समाज गौरव पुरस्कार,नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन केले होते. राज्यातील 26 महिलांना यावेळी गौरविण्यात आले.
रेश्मा शेख या पोलीस मित्र परिवार संघाबरोबरच इंदापूर पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीच्या सदस्या, मानव विकास परिषदेच्या प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
रेश्मा शेख यांनी कोविड काळात रात्रंदिवस महिलांना पोलीस कर्मचारी यांना चहा नाष्ट्याचे वाटप, वृक्षारोपण, घरगुती भांडण तंटा, छेडछाड प्रकरण याबाबतीत पोलीस मित्र परिवाराच्या वतीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, पंढरपूर कडे दर्शनाला जाणाऱ्या वारकरी भक्तांना फळे बिस्किटे वाटप करणे, अन्यायग्रस्त महिलांना मदत करणे आदींसह विविध सामाजिक कार्यात मदत केली आहे.