दिल्ली – महान्यूज लाईव्ह
दिल्लीतील सध्या चर्चेत असलेली अटक म्हणजे सुकेश चंद्रशेखर प्रकरण! आता या प्रकरणात ज्या न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ला जामीन मंजूर केला, त्याच न्यायालयाने आता जॅकलिनला अटक का केली नाही? असा सवाल ईडी ला केला. फक्त सोयीनुसार अटकेची कारवाई करता का? असा सवाल करीत ईडीला न्यायालयाने फटकारले आहे.
काय आहे प्रकरण?
सुकेश चंद्रशेखर याने २०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे, त्यातील बरेचसे पैसे त्याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वर उधळले आहेत. हे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे जबाबही झाले आहेत. तिची चौकशीही झाली आहे. या चौकशीनंतर जॅकलिन फर्नांडिस हिने अटकपूर्व जामीनही या कोर्टाकडून घेतलेला आहे.
आता जॅकलिन फर्नांडिसला पैशाची कमतरता नसल्यामुळे ती परदेशात जाऊ शकते असा युक्तिवाद करीत ईडीने तिचा जामीन नाकारावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांच्या विशेष न्यायालयासमोर सुरू आहे.
या सुनावणीदरम्यान ईडीने सुकेश चंद्रशेखर प्रकरणात सर्व आरोपी अटकेत असताना जॅकलिन फर्नांडिस हिलाच अटक का केली नाही असा सवाल न्यायालयाने केला. याला कारण म्हणजे ईडीने आम्ही सर्व विमानतळांना सूचना दिल्या आहेत असे निवेदन दिले आणि त्यावर न्यायाधिश भडकले. तुम्हाला विमानतळांना सूचना देता येतात, मग जॅकलिन फर्नांडिसला आधीच अटक का केली नाही? असा सवाल केला.
या सुनावणीत जॅकलिनच्या वकिलांनी युक्तीवाद करताना सर्व चौकशी पूर्ण झाल्याचे, तसेच आरोपपत्रही दाखल झाल्याने ईडीच्या कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद केला, तसेच ईडीने सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आलेले नाही, तसेच पुरवणी आरोपपत्रातही तिचे नाव नाही आणि जॅकलिन व नोरा फतेही यांचे जबाब नोंदवले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायाधिश ईडीवर भडकले.
न्यायालयाने या जामीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवली आहे, मात्र यानिमित्ताने महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या कोर्टानेही ईडीच्या चुकांवर बोट ठेवल्याचा संदेश देशभरात गेला असून ईडी खरोखरच सोयीनुसार कारवाई करते या विरोधकांच्या मुद्द्यावर एका अर्थाने शिक्कामोर्तब झाले आहे.