घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
पुणे – भोर तालुक्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदेवाडी गावच्या उपसरपंचपदी कॉग्रेसच्या रेखा रामचंद्र गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर राजगड ज्ञानपीठच्या सचिव स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या हस्ते रेखा गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रोहिणी मारुती गोगावले यांनी ठरलेल्या मुदतीत उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. गुरुवारी ( दि. १० ) रोजी पार पडलेल्या निवडप्रसंगी रिक्त पदासाठी रेखा गोसावी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवनाथ झोळ यांनी काम पाहिले.
यावेळी सरपंच अभिजीत शिंदे, मावळत्या उपसरपंच रोहिणी गोगावले, ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे, प्रवीण शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, वैशाली चौधरी, शारदा शिंदे, शीतल जगताप हजर होते. निवडीनंतर बोलताना उपसरपंच रेखा गोसावी यांनी महिला सक्षमीकरण आणि गावच्या विकासकामाला गती देणार असल्याचं सांगितलं.
ग्रामस्थांच्या वतीने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वेळूचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारे, सरपंच अमोल पांगारे, युवक काँग्रेस भोर वेल्हा मुळशीचे अध्यक्ष महेश टापरे, बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ निगडे, सचिन जाधव, अॅ. यशवंत शिंदे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन बुद्धिवान गोसावी, सोमनाथ सोमानी, हनुमंत शिंदे, लक्ष्मण शिंदे, भोर तालुका काँग्रेसचे माजी युवा उपाध्यक्ष निलेश गोसावी, सदाशिव शिंदे, पांडुरंग चौधरी, मयूर गोसावी, भावेश गोसावी, अनिकेत शिंदे, रोहित शिंदे, योगेश शिंदे, सागर शिंदे, पांडुरंग गोगावले, सुनील गोसावी, राजेंद्र गोसावी, किरण गोसावी, गणेश गोसावी उपस्थित होते.