शिरूर : महान्यूज लाईव्ह
न्हावरे – इनामगाव या रस्त्यावर गेल्या तीन दिवसांत अपघाताची मालिका सुरू असून तीन दिवसात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाले आहेत.
शिरूरच्या पूर्व भागातून न्हावरे इनामगाव दरम्यान एन एच 548 D हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे.या रस्त्यावर गेल्या दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.शिरसगाव काटा नजीक दोन दिवसापूर्वी कार चालकाला रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने येत धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला.
त्यानंतर शिरसगाव काटा ते जगताप वाडी दरम्यान निमोणे येथील दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. १० नोव्हेंबर रोजी पुन्हा निर्वी ते न्हावरे दरम्यान दुचाकीला वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. या सलग तीन दिवसांत झालेल्या अपघातात तीन बळी गेल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
न्हावरे ते इनामगाव दरम्यान गतिरोधक,धोकादायक पाट्या, संरक्षक जाळ्या, बॅरिकेट्स आदी उपाययोजना करायला संबंधित विभागाने करायला हव्यात. तसेच ट्रॉमा केअर अंतर्गत कार्डीयाक रुग्णवाहिका देखील आरोग्य विभागाने उपलब्ध करायला हवी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.