विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामती – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यापार व उद्योग विभागाच्या वतीने बारामतीत उद्योग, व्यापार विषयक मेळावा आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.टी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे राष्ट्रवादी व्यापार व उद्योग आघाडीचे अध्यक्ष वैभव शिंदे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
बारामती शहर व तालुक्यातील औद्योगिक विकास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून व महिलांना गृहउद्योग, तरुणांना लघुउद्योग, फूड पार्क मधून शेतीमाल प्रक्रिया उद्योग, उत्पादित मालाचे मध्यवर्ती विक्री व्यवस्थापन, घन कचरा व्यवस्थापन तसेच सर्व प्रकारच्या उद्योगासाठी महामंडळ, राज्य सरकार,केंद्र सरकार यांच्या अनुदानित योजना, सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बारकावे व घडामोडींचे पी. टी.काळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बाजार समितीचे विठ्ठल खैरे, दत्तात्रय सणस, सचिव अरविंद जगताप, बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, बारामती शहर सोशल मिडियाचे अध्यक्ष तुषार लोखंडे, व्यापारी प्रमोद खटावकर, प्रमोद काकडे, अनिल काळे, अशोकराव तावरे, नितीन तुपे, राजेंद्र खराडे, शरद मचाले, वैभव कापसे, रघुनाथ दाभाडे, प्रविण दाभाडे, सतीश गावडे, अरविंद जगताप आदींसह व्यापारी, उद्योजक तसेच विविध संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.