बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील कार्निव्हल सिनेमागृहात हर हर महादेव चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्याची माहिती मिळताच अखिल भारतीय मराठा महासंघाने या ठिकाणी जाऊन तंबी दिल्यानंतर लागलीच हे पोस्टर काढण्यात आले व येथे चित्रपट सुरू करणार नाही असे आश्वासन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाने दिले.
बारामतीत आज या सिनेमाचे पोस्टर लावण्यात आले होते. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने हा चित्रपट थिएटरला न दाखवण्याच्या सूचना केल्या तसेच लावलेला पोस्टर काढण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले.
याची दखल घेऊन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले यामध्ये यापुढील काळात आम्ही हा चित्रपट दाखवणार नाही तसेच सदर लावलेले पोस्टरसुद्धा काढून घेतले आहे असे लेखी नमूद केले.
या आंदोलनाच्या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी माने, हेमंत नवसारे, अण्णा शितोळे, प्रमोद रणदिवे, धनराज निंबाळकर, अक्षय थोरात, आप्पा निगडे, अमोल चांदगुडे, रोहन शेरकर, प्रशांत सातव, अभिजित शेळके, सुप्रिया बर्गे आदी उपस्थित होते.