सातारा – महान्यूज लाईव्ह
प्रतापगडाच्या पायथ्य़ाशी अफजलखानाच्या कबरीनजिक झालेले अतिक्रमण बुधवारी दिवसभरात अचानक हटविण्यात आले. तब्बल १५०० पोलिसांचा बंदोबस्त व प्रसारमाध्यमांनाही तेथे फिरकण्यास बंदी करीत प्रशासनाने हे अतिक्रमण हटवले.
प्रतापगडाच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून हळूहळू हे अतिक्रमण करण्यात आले होते. तब्बल १९ खोल्यांचे हे अतिक्रमण म्हणजे अफजलखानाचे उदात्तीकरण मानले जात होते. त्या बांधाकामावर हिंदूत्ववादी संघटनांचा प्रचंड रोष होता.
पोलिसांनी अत्यंत गोपनीयरित्या व अचानक ही मोहिम राबवली. या परिसरात त्याकरीता जमावबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान या अतिक्रमण हटावल्यानंतर परिसरात हिंदूत्ववादी संघटना व समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला.