बारामती – महान्यूज लाईव्ह
येत्या ११ व १२ नोव्हेंबर रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे बारामती लोकसभेच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या होत्या. त्यांचा दुसरा दौरा हा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, त्याची तयारी म्हणून प्रल्हादसिंह पटेल हे बारामतीत येणार आहेत.
दरम्यान पटेल यांचा दौरा हा सहकारातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी व येथील सहकार समजून घेणे असाही असन पटेल हे माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी ते इंदापूर, भिगवण आणि दौंड येथे भेट देणार असून भाजपच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.