कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या व राष्ट्रवादीच्याच दोन गटात चुरशीने लढलेल्या गोडसाखर कारखान्याच्या निवडणूकीत हसन मुश्रीफ गटाने सत्ता राखली आहे. हसन मुश्रीफ व डॉ. प्रकास शहापूरकर यांच्या शाहू समविचारी आघाडीने दणदणीत वर्चस्व राखले.
आज झालेल्या मतमोजणीच्या सुरवातीच्या कलामध्ये ब गटात संस्था प्रतिनिधीचा निकाल अगोदर लागला. यामध्ये छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या सोमनाथ अप्पा पाटील यांनी श्री. काळभैरव आघाडीच्या शिवाजी खोत यांचा तब्बल १६२ मतांनी पराभव केला.
ही निवडणूक हसन मुश्रीफ व डॉ. शहापूरकर यांच्या छत्रपती शाहू समविचारी आघाडीविरोधात आमदार राजेश पाटील, माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांच्या श्री. काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीशी झाली.
या निवडणूकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे,
कौलगे-केडगाव गट- डॉ. प्रकाश शहापूरकर, बाळासाहेब देसाई, विश्वनाथ स्वामी. गडहिंग्लज- हनिममाळ गट – अशोक मेंडूले, शिवराज पाटील, अक्षयकुमार पाटील.
भडगाव मुगळी गट – सतीश पाटील, प्रकाश चव्हाण. नूल नरेवाडी गट – सदानंद हत्तरकी, रवींद्र पाटील. महागाव हरळी गट – विद्याधर गुरबे, प्रकाश पताडे, भरमू जाधव.
महिला प्रतिनिधी – मंगल आरबोळे, कविता पाटील, अनुसूचित जाती, जमाती- काशिनाथ कांबळे. इतर मागास प्रतिनिधी- दिग्विजय कुराडे. भटक्या जाती, विमुक्त जमाती प्रतिनिधी- अरूण गवळी.