बाळासाहेब तांबे, भिगवण.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील सख्ख्या भावांनी विजेतेपद पटकावले. एकाच मैदानात शाळकरी भावांनी कुस्ती मारण्याचे हे आगळेवेगळे उदाहरण आहे.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निरगुडे या इंदापूर घुले बंधूंनी ही विजेतेपदाची कमाल करून दाखवली. भोर येथे इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
भोर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने 74 किलो वजन गटात किरण संपत घुले याने प्रथम क्रमांक मिळवला तर त्याचाच बंधू रविराज संपत घुले याने विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेज इंदापूर यांच्या वतीने खेळताना 86 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला ग्रामीण भागातील या बंधूंनी केलेल्या कामगिरीचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे