सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सर्वदूर प्रसिद्ध असणाऱ्या इंदापूरच्या चांदशावली बाबा दर्ग्यास माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी काल भेट देऊन दर्शन घेतले. दर्ग्याची पाहणी करून दर्गा सुधारण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अहेमदरजा सय्यद आदी उपस्थित होते.