मुंबई : महान्यूज लाईव्ह
जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या इलोन मस्क यांनी अखेरीस व्टिटरवर ताबा मिळवला आहे. यानंतर त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. यातील काही निर्णयांव्दारे भारतातील बहुतांश कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
व्टिटरवर मालकी मिळाल्यावर मस्क सर्वप्रथम भारतीय वंशाच्या पराग आगरवाल यांना काढून टाकणार याबाबत सर्वांनाच खात्री होती. त्याप्रमाणे त्यांनी केलेही. पण त्यांना ट्विटरमध्ये कामगार कपातीची मोठी मोहीमच त्यांनी सुरु केली. या मोहिमेत भारतातील ३०० पैकी २५० कर्माचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला.
कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांना भारतीय वेळेनूसार पहाटे ४ वाजता एक मेल केला. ‘ व्टिटरला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आम्ही जगभरातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाणार आहोत. आम्ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसोबतच व्टिटर सिस्टम आणि युझर डेटासाठी सर्व ऑफिसेस तात्पूरत्या स्वरुपात बंद करू. जर तु्म्ही ऑफिसमध्ये आहात किंवा जात असाल तर कृपया घरी जा.’ कंपनीकडून जगभरातील सर्वच कर्मचाऱ्यांना हा मेल पाठविला गेल्याची माहिती आहे. याच प्रक्रियेव्दारा भारतात व्टिटरच्या ३०० पैकी २५० कर्मचाऱ्यांना एका तडाख्यात घरी बसविण्यात आले आहे.
आता यापुढे मस्क आणखी कोणकोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.