राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील बोरीभडक येथील जॉली लॉजवर यवत पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. या लॉजवर काही महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याने याप्रकरणी लॉज चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
दौंड व उरुळी कांचनच्या सीमेवर असलेल्या बोरीभडक येथील नक्षत्र लॉजवर काही दिवसापूर्वी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. या लॉजच्या जवळ असलेल्या जॉली लॉजवर गुरुवारी ( दि ४ ) यवत पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी लॉज चालक प्रभाकर गुलाब मदने ( वय 36 रा. भोसरी, जि. पुणे. मुळ रा. बोरी, पोस्ट नारंगवाडी, ता.उमरगा जि. उस्मानाबाद ) व उमेश ब्रम्हा शिंदे ( वय 35, रा. उरूळीकांचन आश्रम रोड, ता. हवेली, जि. पुणे ) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी पोलिसांनी लॉजची झाडाझडती घेतली असता ८ हजार ५३० रुपये ७० हजार रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, १८४ कंडोम पाकीट असा एकूण ९० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या लॉजवर पिडीत मुलीला पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या पिडीत मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी फिर्याद दिल्याने स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.