राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
पुणे महानगरपालिकेची ग्रामीण भागात सुरू असलेली हडपसर ते पाटस ही पीएमपीएमएल बससेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती ही बससेवा पाटसपर्यंत पुन्हा सुरू करावी अशी मागणी पाटस ग्रामविकास फाउंडेशनने पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
पुणे महानगरपालिकेची पीएमपीएमएलची बस हडपसर ते कुरकुंभ अशी बससेवा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी चालू करण्यात आली होती, मात्र ही बससेवा कोणतेही ठोस कारण न देता जून महिन्यापासुन बंद करण्यात आली, ही बससेवा हडपसर ते पाटस पर्यंत सुरू करावी अशी मागणी मागणी काही दिवसांपासून पाटस, कुसेगाव,कानगाव,रोटी व परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.
पुण्याला कामानिमित्त व शालेय विद्यार्थी नियमित प्रवास करणाऱ्या अनेक प्रवासांची ही बससेवा बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, एसटी बसची ताटकळत बसत तासनतास वाट बघत बसावे लागते,ही प्रवाशांची ससेहोलपट होत आहे. यामुळे पुणे महानगरपालिका पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया व वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी हडपसर – पाटस बससेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी ग्रामविकास फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन याबाबत निवेदन देऊन केली आहे.