बारामती : महान्यूज लाईव्ह
देवी अहिल्या की नगरी इंदौरला भेट देण्यासाठी निघाले आहेत बारामतीकर. देशात आणि जगातही जिच्या कार्याची पताका दुमदुमत आहे, ती एक मराठी स्त्री. तिने महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेशात उभ्या केलेल्या वैभवाचे साक्षी होण्यासाठी तुम्हीदेखील या सहलीत सहभागी होऊ शकता.
अहिल्यादेवींच्या पाऊलखुणांना नमन करणारी ही सहल इंदूर, मंडू, उज्जैन, ओकांरेश्वर आणि महेश्वर या ठिकाणी भेट देणार आहे. मल्हारराव होळकरांनी उभारलेल्या इंदुरमधील राजवाडे, म्युझियम्स, मंदिरे, ओंकारेश्वर येथील ऐतिहासिक शिवमंदीर, रावेरखेडी येथील पेशवा बाजीरावांची समाधी तसेच महेश्वर येथील मंदिरे, घाट, किल्ला, माहेश्वरी साडी निर्मिती सेंटर, यासोबत मंडू येथील ऐतहासिक किल्ल्यावर ही सहल आपल्याला घेऊन जाणार आहे.
फलटणच्या दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा टुर्समार्फत या सहलीचे आयोजन केले गेले आहे. त्यांच्याकडे अनेक वर्षाचा अशा सहलींचा अनुभव असल्याने बारामतीकरांची ही सहलही मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडणार आहे. राणी अहिल्यादेवी, होळकर घराणे आणि मराठ्यांच्या इतिहासाबाबत परिपूर्ण माहिती असणाऱ्या जाणकार व्यक्ती या सहलीसोबत असणार आहेत. हॉटेलवर राहण्याची व्यवस्था तर दर्जेदार भोजनव्यवस्था त्यामुळे या सहलीचा आनंद व्दिगुणीत होणार आहे.
देशाचे श्रद्धास्थान असणाऱ्या राणी अहिल्यादेवींचे हे कर्तृत्व प्रत्यक्ष पाहण्याची ही संधी बारामती, फलटण आणि परिसरातील पर्यटनप्रेमींनी निश्चितपणे घ्यावी अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये जाणार असलेल्या या सहलीत सहभागी होण्यासाठी कृपया घनश्याम केळकर – ९८८१०९८१३८, शेखर हुलगे – ९३०७८३९७९७, शीतल अहिवळे – ९७६२९८०४७९ या क्रमांकावर संपर्क साधावा