शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या मांडवगण फराटा येथील सभेकडे शिरूर तालुक्यातील सभासदांचे लक्ष लागले आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विरुद्ध सर्वपक्षीय घोडगंगा किसान क्रांती पॅनल अशी समोरासमोर लढत होत आहे.
घोडगंगा साखर कारखान्यावर वाढलेला ४५० कोटीचा कर्जाचा बोजा,कामगारांचे पगार आदी प्रश्न किसान क्रांती पॅनल ने उपस्थित केले असून सभासदांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी (दि.३) रोजी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत विरोधकांच्या आरोपांचे खंडन करत टीकेचे बाण सोडले आहे. त्यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील मांडवगण फराटा मध्ये काय बोलणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.