दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील चौफुला येथे शनिवारी (दि.५) नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना या निमित्ताने मिळणार आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते, शिवकृपा डेव्हलपर्स चे संस्थापक तानाजी केकाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
केंद्र आणि राज्य सरकारने विविध क्षेत्रामधील अनेक उद्योग व्यवसायामध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले आहेत. त्याच धर्तीवर स्थानिक तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिवाजी केकाण यांनी केला आहे.
कोरोना महामारी मुळे अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या गावी गेले आहेत. त्याचा मोठा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होत आहे. मन्युष्यबळ उपलब्ध होत नसल्याने उद्योगधंदे सुरु करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बेरोजगार युवकांना नोकरी उपलब्ध होण्यासाठी केकाण यांच्या संकल्पनेतून ॲड. राहुलदादा कुल विचारमंच आणि शिवकृपा डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य नोकरी महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बेरोजगारीवर मात करण्यासाठी भव्य मोफत नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. परिसरातील तरुण तरुणींना विविध क्षेत्रातील नामांकीत ५० पेक्षा अधिक कंपन्यांमद्ये नोकरीची सुवर्णसंधी यामुळे उपलब्ध होणार असून महोत्सवाच्या ठिकाणीच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याच्या हेतूने चौफुला येथील शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यत श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय मोरगाव – सुपा रोड, चौफुला याठिकाणी या नोकरी महोत्सवा होणार असुन इच्छुकांनी बायोडाटा व सर्व कागदपत्रासह उपस्थित राहावे. तसेच इच्छुकांनी https://forms.gle/322s6HkEakcFbiVR9 या लिंकवर आपली माहिती भरावी अथवा अधिक माहितीसाठी 9822218121 या नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन केकाण यांनी केले आहे.