बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती बस आगाराच्या व्यवस्थापकांनी अशी दणदणीत कारवाई पहिल्यांदाच केली आहे की, त्याचे कौतुकच करायला हवे.. कारण बारामतीच्या एसटी आगारातील चार चालक, चार वाहक व वाहतूक नियंत्रक अशा नऊ जणांना आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी काल निलंबित केले.
एसटीच्या ठरलेल्या मार्गावर व मार्गापर्यंत बस न नेता ती अर्ध्या रस्त्यातून परत आणल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली त्यासाठी जबाबदार धरून ही कारवाई करण्यात आली आहे.
1 नोव्हेंबर रोजी बारामती ते नीरा या ठिकाणी जाणारी एसटी बस वडगाव निंबाळकर या बस स्थानकातूनच परत आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बारामतीमधून निघाल्यानंतर वडगाव निंबाळकर येथूनच या चार बसेस माघारी फिरवल्या.
त्यामुळे वडगाव निंबाळकर येथून नीरा बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या बाबत तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई झाली.