दिल्ली : महान्यूज लाईव्ह
निवडणूक आयोगाने चुप्पी साधलेल्या गुजरातची निवडणूक आज अखेर जाहीर झाली असून येत्या एक आणि पाच डिसेंबर रोजी गुजरात मध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर आठ डिसेंबर रोजी गुजरात मध्ये मतमोजणी होणार आहे.
गुजरात मध्ये 4.9 कोटी मतदार असून या राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेताना मोरबी येथील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
गुजरातमध्ये सध्या निवडणूक प्रचारात आम आदमी पार्टीने देखील शिरगाव केला असून या ठिकाणी आम आदमी पार्टीने गुजरात मधील 25 वर्ष सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये महिलांसाठी १२७४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासांठी खास १८२ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.