शिरूर – महान्यूज लाईव्ह
घोडगंगा साखर कारखाना निवडणूक सुरू असून सत्ताधारी मात्र तालुक्यात कसा विकास केला याचे गोडवे गातात त्यांच्या कडे २५ वर्षे कारखान्याची एकहाती सत्ता आहे त्यांना कारखान्याचे साधे पत्रे ही बदलता आले नाहीत या सारखे मोठे दुर्दैव कोणते असा सवाल घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केला आहे.
निमोने (ता.शिरूर) येथील घोडगंगा साखर कारखाना निवडणुकीनिमित्त आयोजित गावभेट दौऱ्यात फराटे हे बोलत होते. यावेळी बोलताना दादा पाटील फराटे म्हणाले की, घोडगंगा साखर कारखान्यावर चेअरमन अशोक पवार यांची गेली २५ वर्षे सत्ता आहे.या काळात कारखाना जास्त अधोगतीला गेला असून कारखाना पूर्ण डबघाईला आणला आहे.कारखान्याच्या कामगारांना कायम पिळवणूक वेळच्या वेळी पगार नाही मात्र स्वतःच्या फायद्यासाठी कायम राबवून घेतले जात आहे.तालुक्यात तुम्ही मोठ्या विकासाच्या गप्पा हाणता मग कारखान्याची दुरवस्था का दिसत नाही?
येणारा गळीत हंगाम आला की कारखाना सुस्थितीत येणार असे सभासदांना सांगता मात्र कारखाना सुस्थितीत येण्याऐवजी अजूनच संकटात जात आहे.स्वतःचा कारखाना पाच वर्षात नील केला मग हा कारखाना अडचणीतून बाहेर काढायला काय अडचण आहे ? अजून किती काळ जनतेला फसवणार आहात? यावेळी तुमची सत्तेची मुजोरी अन् पैशाची गुर्मी सभासद चालू देणार नाही अशी टीका दादा पाटील फराटे यांनी केली.
या वेळी आबासाहेब गव्हाणे, ॲड.सुरेश पलांडे,महेश ढमढेरे आदींनी कारखान्याची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली.यावेळी उमेदवार वीरेंद्र शेलार, सुवर्णा फराटे,तात्यासाहेब घाडगे, मच्छिंद्र थोरात,आबासाहेब गव्हाणे,राहुल गवारी,बाळासाहेब कोळपे, मंदाकिनी नागवडे,शांताराम कांबळे, दत्तोबा शेंडगे, पांडुरंग दुर्गे, अशोक गारगोटे, दिलीप हिंगे, विजय भोस, मयूर ओस्तवाल, सचिन मचाले, संतोषअप्पा काळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते यांसह सभासद, शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.