दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड शहरासह कुरकुंभ परिसरातील जगताप ए.जी व जगताप अँडिशनल, लिंगाळी, खोरवडी व मळद तलाव परिसरातील विद्युत रोहित्रे व रोहितमधील आहे तांब्याच्या तारा आदी १ लाख ४२ हजार ५०० पाचशे रुपये किमतीच्या साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली
दौंड तालुक्यातील मळद तलाव येथील नसले डिपी येथील विद्युत रोहित्र पाडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या, तसेच कुरकुंभ परिसरातील जगताप वस्ती येथील दोन रोहीत्रे, लिंगाळी येथील रोहीत्रे तसेच खोरवडी येथील कुचेकर वस्ती येथील विद्युत रोहित्रांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत. या विविध ठिकाणी असलेल्या रोहीत्रे व त्यामधील तांब्याच्या तारा असा एकूण १ लाख ४२ हजार ५०० पाचशे रुपये किमतींचे विद्युत साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने महावितरणलाही मोठा धक्का बसला आहे.
याप्रकरणी महावितरण विद्युत कंपनीचे अधिकारी शरद अवताडे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे हे करीत आहेत.
दरम्यान, दौंड व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, विहिरीवर असलेले विद्युत साहित्य याचबरोबर महावितरण विद्युत कंपनीच्या रोहित्रे तांब्याच्या तारा ऑईल आशा विद्युत साहित्यांच्या रात्रीच्या सुमारास चोरीचे प्रकार वाढले आहेत. विद्युत साहित्याची चोरी करणारी मोठी टोळी तालुक्यात सक्रिय असल्याचे चित्र या चोरीच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी महावितरण विद्युत कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईची आवश्यकता आहे.