बारामती – महान्यूज लाईव्ह
चक्क बारामतीत आरोग्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडील एक महिला कर्मचारी शरीरसुखासाठी सुपरवायझरला पाहिजे आहे. हो, त्याने अशी मागणीच केलीय. या अश्लिल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे.
नगरपरीषदेत आरोग्याची व स्वच्छतेसाठी कामे करण्यासाठी ठेकेदार नेमलेले आहेत. मात्र या ठेकेदारांकडे काम करणाऱ्या गोरगरीब महिलांबाबत अत्यंत अश्लिल व मानहानीकारक एक ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये आरोग्य विभागाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीचा सुपरवायझर व एका कर्मचाऱ्यामधील संवाद आज व्हायरल झाला. यामध्ये काम करणाऱ्या महिलांपैकी कोण सुंदर आहे, कशी दिसते, मला ती कसल्याही परिस्थितीत पाहिजे अशा प्रकारचे ते संभाषण आहे. दरम्यान मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या ठेकेदाराला नोटीस काढली असून संबंधित सुपरवायझर व संभाषण केलेल्या दोघांनाही कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. अर्थात या प्रकरणातील गांभिर्य लक्षात घेता हे प्रकरण तेवढ्यावरच आटोपेल अशी कोणतीही चिन्हे आहेत. त्यामुळे याचे पडसाद तीव्र उमटण्याची चिन्हे आहेत.
नेमके काय आहे संभाषण? (या संभाषणात अश्लिल शब्दप्रयोग असून तो वगळून हे संभाषण..)
सुपरवायझर – त्या पाच महिला नाही का.. त्या काम करीत नाहीत.. त्यांना
कर्मचारी – त्यांना घरी पाठवलंय..
सुपरवायझर – पण ती कोण रे.. ती लय भारी दिसते
कर्मचारी – तिचा विषय वाजवू आपण… तिला भेटायला एक पोरगं येतं.. डिलिव्हरीतलं हाय..
सुपरवायझऱ – त्याला माझा नंबर दे.. म्हणावं, तुला काय पाहिजे ते देतो.. माझा नंबर त्या झोमॅटोवाल्याला दे..
कर्मचारी – नको, नंबर नको.. आपण मग जाळ्यात गुतू..
सुपरवायझर – त्याच्या आई….(पुढे फारच अश्लिल संभाषण) ..मला माहिती नाही.. मला ती पाहिजे आणि ती मिळवून दे..
कर्मचारी – बरं बरं.. करू तो विषय आपण. मी जरा लांब पाठवतो.. मग हळूहळू करा की.. झलक करत करत करा की.. मग होतंय सगळं..! मी नंबर मागितला, पर दिला नाही.. दुसरी आहे की, मग तिचा नंबर आहे माझ्याकडं..
सुपरवायझर – ती कशाला..? नको, मला ते काही माहिती नाही. त्या पाच मधला एक नंबर पाहिजे..
कर्मचारी – बरं बर.. त्यांना अगोदर बरोबर पट्टीत घेतो.. पण ती दुसरी आहे ना, साहेब, ती एकशे एक टक्के… तुम्हाला मिळंल बगा..
सुपरवायझर – नाही, नको, ती छपरी आहे..
कर्मचारी – आता कसं.. हे आता कसे तुम्हाला कळले?
सुपरवायझऱ – अरे, मी बघितलं की लगेच समजून घेतो की.. मला त्या पाच मधीलच पाहिजे.. (त्यानंतर बरंच अश्लिल संभाषण व महिलांची नावे घेतली गेली आहेत)
कर्मचारी – बरं, बरं… मी ते कुत्रं उचलून टाकलं.. मेसेज आलाय.. व्हेरी गुड वर्क..!