मुंबई : महान्यूज लाईव्ह
गुजरातच्या मोरबीतील झुलता पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३४ जण मृत्यूमुखी पडले. याच दुर्घटनेतील जखमींना भेटण्यासाठी आज पंतप्रधान मोदी मोरबी येथील रुग्णालयाला भेट देणार आहेत. परंतू त्यापुर्वी मध्यरात्रीत या सरकारी रुग्णालयात रंगरंगोटी सुरू असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. आता या फोटोवरून हे रुग्णालय चर्चेत आले आहे.
मध्यरात्रीतून या रुग्णालयाच्या काही भिंती आणि छत नव्याने रंगविण्यात आले. पाण्याचे नवे कुलर्स आणले गेले. जखमींच्या बेडवरील बेडशीट्सही बदलण्यात आले. रुग्णालयाची तातडीने साफसफाई करण्यात आली. या सगळ्याचे फोटो आता सोशल मिडियावर झळकू लागले आहेत. इतके लोक मेले तरी मोदींच्या भेटीचा इव्हेंट चांगला व्हावा याचीच काळजी आहे. मोदींचा फोटो चांगला यावा म्हणून तयारी सुरू आहे, असा खोचक टोला कॉंग्रेसने लगावला आहे.
जर भाजपाने २७ वर्षात काम केले असते तर अर्ध्या रात्री रुग्णालयाची रंगरंगोटी करण्याची वेळ आली नसती असे आम आदमी पार्टीने आपल्या व्टिटरवर म्हणले आहे.
गुजरातमध्ये सध्या निवडणूकांचे वारे सुरु आहे. त्यातच ही दुर्घटना घडल्याने यावर विरोधक जोरदार टिका करत आहेत.
त्या झुलत्या पुलाचे व्हिडिओ पाहिले तर त्यात काही व्यक्ती फुलावर उड्या मारून दोर तोडायचा प्रयत्न करताना दिसतात. हा स्वैराचार आणि माजुरेपणा करण्याची हिंमत कशी काय होते यांची…?