शिरूर : महान्यूज लाईव्ह
जी लोकं कुणाच्या सुखदुःखात कधी नव्हती ते आता कशी जागी झालीत? इतक्या दिवस त्यांना तालुक्यातला सभासद कसा दिसला नाही असा सवाल आमदार अशोक पवार यांनी केला. शिरसगाव काटा तालुका शिरूर येथे घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकिनिमित गावभेट दौऱ्यात आले असता ते बोलत होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, घोडगंगा साखर कारखाना निवडणूक सध्या सुरू आहे. जे विरोधक आमच्यावर सातत्याने आरोप करतात त्यांना एक संस्था नीट चालवता आली नाही. मागील सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका साखर कारखान्याला बसला.त्यामुळे कारखाना अडचणीत आला.
कोरोना काळात जे सुख दुःखात जे विचारपूस करत नव्हते, ते आता गावोगावी मत मागण्यासाठी फिरत आहेत. कोण कोणाच्या सुखदुःखात आहे हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे सभासद सर्व काही ठरवणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
यावेळी दिलीप मोकाशी यांनी भाषण केले. तर उमेदवार नरेंद्र माने, सचिन मचाले, शिवाजी गदादे यासह पॅनल चे उमेदवार, ग्रामस्थ उपस्थित होते