बाली, इंडोनेशिया
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बाली, इंडोनेशिया येथे दि. २९ ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय उज्ज्वल भविष्यासाठी जैव तंत्रज्ञान या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन उधायाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. नोमन डे व अधिष्ठाता डॉ. नी. लूह वातीनीयासी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, डॉ.अरविंद देशमुख, डॉ रेटनो आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बाली, इंडोनेशिया येथे उधायाना विद्यापीठ , बाली व विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. राकेश त्रिवेदी, डॉ. सिमा सांबरानी, डॉ रेटनो, डॉ. अंबिकाॅपथी डॉ पनीरसिल्व्हम यांनी जैवतंत्रज्ञानाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकणारी उत्कृष्ट बीजभाषणे करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत हायब्रीड मोडवर आज भारत इंडोनेशिया व सौदिया अरेबिया येथील संशोधकांनी एकूण ८० शोधनिबंध सादर केले.
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी भारतातून उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, प्रा.निलीमादेवी, डॉ. संजय कांबळे आणि इतर सर्व संयोजन समिती सदस्यांनी तसेच बाली येथून अध्यक्षा डॉ. रेटनो, डॉ. किर्ती आफळे, डॉ. देशमुख, डॉ .भरत शिंदे. प्रा. नीलिमा पेंढारकर, डॉ.ठाकरे, डॉ. शर्मा यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आंतरराष्ट्रीय परिषदेचा पहिला दिवस यशस्वीरित्या पार पडला.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री. किरण गुजर, श्री. मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महाविद्यालयाने पुढाकार घेऊन परदेशात प्रथमच अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्तम आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.